दुसरा डोस घेणाऱ्यांना लसींची प्रतिक्षा कायम! आरोग्य अधिकाऱ्यांचे काळजी न करण्याचे आवाहन..

vaccin

औरंगाबाद : महापालिकेने जम्बो लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. त्याअंतर्गत तीन लाखांचा टप्पा पार केला आहे. शासन आदेशानुसार एक मेपासून १८ ते ४० वयोगटातील नागरिकांचेही लसीकरण सुरू झाले आहे. मात्र लसींच्या तुटवड्यामुळे ४५ च्या पुढील नागरिकांचे लसीकरण तूर्तास थांबवण्यात आले आहे. मात्र यामुळे यामुळे यातील अनेकांचे दुसरे डोस चुकले आहेत. लसी येईपर्यंत दुसरा डोस घेणाऱ्यांना प्रतिक्षा करावी लागणार आहे. शुक्रवार पर्यंत लस येण्याची शक्यता असल्याची, तसेच दुसरा डोस ६ ते ८ आठवड्यापर्यंत घेता येऊ शकतो. अशी माहिती पालिकेच्या आरोग्य वैद्यकीय डॉ. नीता पाडळकर यांनी दिली.

१६ जानेवारीपासून लसीकरण मोहिम सुरु केली आहे. महापालिकेने जम्बो लसीकरण मोहीम सुरू करत ११५ वॉर्डात केंद्र सुरु केले आहेत. त्यासोबत खासगी २६ व सरकारी दोन अशा केंद्रावर शहरात लसीकरण सुरू आहे. आत्तापर्यंत दोन लाख ३६ हजार १८४ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. दररोज सहा ते सात हजार नागरिकांना लस दिली जात असल्याने महापालिकेने प्रत्येक आठवड्यासाठी एक लाख लसींची मागणी नोंदविली होती.

दुसरा डोस चुकला, अनेकांनी व्यक्त केली भिती

गेल्या ४ दिवसांपासून लसींच्या तुटवड्यामुळे ४५ प्लस नागरिकांचे लसीकरण बंद करण्यात आले आहे. यातील अनेकांचे दुसरे डोसही चुकले आहेत. दुसरा डोस घेण्यासाठी शहरातील वेगवेगळ्या केंद्रांवर जाऊनही अनेकांना रिकामेच परतावे लागले. ३० एप्रिलला कोवॅक्सिनचे दुसरे डोस अनेकांना मिळाले मात्र कोविशिल्ड उपलब्ध नसल्याने इतरांना लस येईपर्यंत प्रतिक्षा करावी लागणार आहे.

घाबरण्याची गरज नाही, दुसरा डोस मिळेल

७ मे पर्यंत लसी येण्याची शक्यता आहे. त्यानंतर दुसरा डोस असणाऱ्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. तरीही ज्यांचे दुसरे डोस सध्या चुकले आहेत. त्यांनी घाबरून जाऊ नये, काळजी करु नये. कारण सहा ते आठ आठवड्यापर्यंत दुसरा डोस घेऊ शकतो. लवकरच लसी उपलब्ध होतील तसे लसीकरण सुरु होईल. अशी माहिती मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या