धर्माच्या रक्षणासाठीच गौरी लंकेश यांची हत्या ; आरोपी परशुराम वाघमारेची कबुली

गौरी लंकेश, कॉम्रेड गोविंद पानसरे आणि प्रा. एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येसाठी एकाच शस्त्राचा वापर

बंगळुरू: पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या परशुराम वाघमारे यानेच केली असल्याची माहिती विशेष तपास पथकाने पीटीआयला दिली आहे.

गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने परशुराम वाघमारे नावाच्या एक व्यक्तीला हत्येचा आरोप ठेवत अटक केली आहे. एसआयटीच्या सुत्रांनुसार, गौरी लंकेश यांची हत्या केल्याची कबूली परशुराम वाघमारेने दिली आहे.

‘धर्माच्या रक्षणासाठी मला एकाची हत्या करायची आहे, असं मला मे २०१७ मध्ये सांगण्यात आलं. मी त्यासाठी तयार झालो. ज्या व्यक्तीला मारायचे आहे त्याच्याबद्दल माहीच माहिती नव्हतं, अशी कबुली वाघमारेने दिली आहे.

तसेच, गौरी लंकेश, कॉम्रेड गोविंद पानसरे आणि प्रा. एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येसाठी एकाच शस्त्राचा वापर करण्यात आल्याचंही एसआयटीने म्हटले आहे.