‘वडेट्टीवार काम चलावू मंत्री, त्यांना कॅबिनेटमध्येही महत्व नाही’; निलेश राणेंची टीका

nilesh rane vs vijay wadettiwar

पुणे : मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार हे अनलॉक च्या गोंधळावरून टीकेच्या भोवऱ्यात सापडले होते. त्यांच्या काही विधानांमुळे जनतेत मोठा संभ्रम निर्माण झाला होता. दरम्यान, ते काल पुणे दौऱ्यावर होते. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांना राज्य सेवेच्या रखडलेल्या विविध नियुक्त्यांबाबत प्रश्न केला असता त्यांनी ठोस उत्तर दिलं नाही. यामुळे परीक्षा उत्तीर्ण होऊन देखील अनेक उमेदवारांना आता भविष्याचा आणि उदरनिर्वाहाचा प्रश्न भेडसावत आहे.

तर एमपीएससीच्या परीक्षा देखील कोरोना काळात रखडल्याने नवीन नियुक्त्यांसाठी परीक्षा कधी जाहीर होणार याबाबत कोणतीही स्पष्टता नाही. यामुळे एमपीएससी परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या मनात भविष्याची चिंता निर्माण होत आहे. तसेच, आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने अभ्यास, शारीरिक तयारी यात अनेक अडथळे येत असून राज्य सरकारने लवकरात लवकर ठोस निर्णय न घेतल्यास पुन्हा उमेदवारांच्या भावनांचा उद्रेक होण्याची शक्यता आहे.

विजय वडेट्टीवार यांनी ठोस भाष्य न केल्याने भाजप नेते निलेश राणे यांनी ‘महाराष्ट्र देशा’शी बोलताना टीकास्त्र सोडलं आहे. ‘वडेट्टीवार या विषयावर बोलूच शकणार नाहीत. कारण त्यांचं तसं वजनच नाहीये. ते हुशार नाहीत किंवा त्यांना कॅबिनेटमध्येही महत्व नाही. ते फक्त काम चलावू मंत्री आहेत. ते फक्त स्वतःच महत्व आणि अस्तित्व दाखवण्यासाठी वारंवार पत्रकार परिषद घेतात. या पलीकडे त्यांना महत्व नाही,’ असं भाष्य निलेश राणे यांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP