महाविकास आघाडीची खरी कसोटी ? , नगरपरिषदा, नगरपंचायतींसाठी ९ जानेवारीला मतदान

mahavikas aaghadi

मुंबई : कन्हान- पिंपरी (जि. नागपूर) व गडचांदूर (जि. चंद्रपूर) नगरपरिषद आणि लांजा (जि. रत्नागिरी) नगरपंचायतीच्या सार्वत्रिक; तर इतर विविध नगरपरिषदा/ नगरपंचायतींमधील सहा रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 9 जानेवारी 2020 रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी 10 जानेवारी 2020 रोजी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी मुंबई येथे दिली.

मदान यांनी सांगितले की, या सर्व संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. नामनिर्देशनपत्रे 16 ते 20 डिसेंबर 2019 या कालावधीत सादर करता येतील. त्यांची छाननी 21 डिसेंबर 2019 रोजी होईल. अपील नसलेल्या ठिकाणी 27 डिसेंबर 2019 पर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. अपील असलेल्या ठिकाणी अपिलाच्या निर्णयानंतर तिसऱ्या दिवसापर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेता येतील. मतदान 9 जानेवारी 2020 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी 10 जानेवारी 2020 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल.

रिक्त पदांसाठी पोटनिवडणुका होणाऱ्या जागांचा नगरपरिषद/ नगरपंचायतनिहाय तपशील: तळेगाव दाभाडे (जि. पुणे)- 7ब, देवळा (नाशिक)- 11, भुसावळ (जळगाव)- 24अ, नेवासा (अहमदनगर)- 13, नांदुरा (बुलढाणा)- 7ब आणि कळमेश्वर ब्राम्हणी (नागपूर)- हद्दवाढ क्षेत्रासाठी.

दरम्यान, राज्यात महाविकास आघाडीचा नवा प्रयोग करत शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस यांनी एकत्र येत सरकार स्थापन केलं आहे. मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीत हा प्रयोग कितपत यशस्वी होतो हे खर पाहण्यासारख असणारं आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेनंतर होणाऱ्या पहिल्या निवडणुकीत महाविकास आघाडीची खरी कसोटी लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या