नांदेड-वाघाळा महापालिकेसाठी मतदान सुरु, अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला

नांदेड: नांदेड-वाघाळा महापालिका निवडणुकीसाठी आज सकाळी साडे सात वाजल्यापासून मतदानाला सुरवात झाली आहे. ८१ जागांसाठी ५७८ उमेदवार आपल नशीब आजमावत आहेत. या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक २ मध्ये प्रायोगिक तत्त्वावर व्हीव्हीपैट मशीनचा(व्होटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल) वापर होत आहे.

सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान सुरु आहे तर १२ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीमध्ये कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.