लग्नाप्रमाणे मतदानही महत्वाचे, नववधूचे आधी मतदान नंतर लग्न

पुणे: लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा उत्साह देशभरात पहायला मिळत आहे. पुण्यामध्ये नववधू लग्नाप्रमाणे मतदानही महत्वाचे मानत मतदान केल्यानंतर लग्नाच्या बोहल्यावर चढली आहे.

पुण्यात श्रद्धा भगत या नववधूने लग्नापूर्वी मतदानाचा हक्क बजावत एक सजग नागरिक असल्याचा संदेश दिला आहे, लग्नाच्या व्यस्त कार्यक्रमांमधून वेळ काढत श्रद्धाने मतदान केलं आहे. पुण्यातील नु. म. वी शाळेत श्रद्धाने मतदान केलं आहे. माझ्यासाठी लग्न जस महत्त्वाच आहे तितकंच महत्वाच मतदान देखील आहे. म्हणून मी लग्नाच्या व्यस्त वेळेतूनही वेळ काढत मतदान करण्यासाठी आले आहे, असं श्रद्धाने सांगितले.

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडत आहे, सकाळी उत्साहात सुरू झालेल्या मतदानाला दुपारपर्यंत काहीसा ब्रेक लागल्याचं दिसत आहे. दुपारी 1 वाजेपर्यंत राज्यात सर्वाधिक 42 टक्के मतदान कोल्हापूरमध्ये पार पडले आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघात उन्हामुळे मतदारांचा ओघ कमी झाला आहे. पुण्यात 1 वाजेपर्यंत 27 टक्के मतदान झाले आहे. दुपारी 4 च्या पुढे पुण्यातील आकडा वाढण्याची शक्यता आहे.

राज्यातील दुपारी 1 पर्यंतचे मतदान

कोल्हापूर – 42 %
हातकणंगले – 40 %
सांगली – 34 %
सातारा – 43 %
माढा 33 %
पुणे – 27 %
बारामती – 35 %
अहमदनगर – 34 %
जळगाव – – 33 %
रावेर – 35 %
जालना – 37 %
औरंगाबाद – 35 %
रायगड – 38 %
रत्नागिरी – सिंधुदुर्ग – 39 %Loading…
Loading...