विद्यापीठ निवडणुकीसाठी मतदान संपन्न

pune university gate

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन आणि पदवीधर गटांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी मतदान मोठ्या उत्साहात पार पडले. या निवडणुकीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि मुख्यमंत्र्यांचे चुलत भाऊ प्रसेनजित फडणवीस उतरल्याने या निवडणुकीला आगळेवेगळे महत्व प्राप्त झाले आहे.

व्यवस्थापन गटातून सुनेत्रा पवार या आधीच बिनविरोध निवडून आल्या आहेत. विद्यापीठ विकास मंच पुरस्कृत एकता पॅनल, विद्यापीठ प्रगती पॅनल आणि विद्यापीठ विकास मंडळ, असे तीन पॅनल या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. निवडणुकीसाठी एकुण ४८ हजार पदवीधर मतदान करणार आहेत. या निवडणुकीचा निकाल हा सोमवारी संध्याकाळपर्यंत लागणार आहे.

1 Comment

Click here to post a comment