fbpx

अखेरच्या टप्यातील मतदानाला सुरुवात, पंतप्रधान मोदींसह भाजपची प्रतिष्ठापणाला

टीम महाराष्ट्र देशा: लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. सात राज्यांतील ५९ जागांसाठी हे मतदान होत आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी लढत असलेल्या वाराणसी लोकसभेचा देखील समावेश आहे.

सतराव्या लोकसभेसाठी एकूण सात टप्यामध्ये मतदान घेण्यात आले आहे, आज अखेरच्या टप्यात पंतप्रधान मोदींसह भाजपची प्रतिष्ठापणाला लागली आहे. नरेंद्र मोदी, पंजाबच्या गुरूदासपूर मतदारसंघामधून भाजपने अभिनेते सनी देओल, चंदीगडमधून विद्यमान खासदार किरण खेर, केंद्रीय मंत्री मनोज सिन्हा यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे.

अखेरच्या टप्प्यात निवडणुकीच्या रिंगणात ९१८ उमेदवार आहेत. १० कोटींहून अधिक मतदार त्यांचे भवितव्य ठरवणार आहेत. तर २३ मे रोजी दिल्लीच्या सत्तेचे चित्र स्पष्ट होणार आहे.

सकाळी ९ वाजेपर्यंत राज्यनिहाय मतदानाची आकडेवारी

बिहार- १०.६५ %

चंडीगड – १०.४०

हिमाचल प्रदेश – १.२९

झारखंड- १३.१९ %

मध्य प्रदेश – ८.८० %

पंजाब- ५.७७ %

उत्तर प्रदेश – ६.२७ %

पश्चिम बंगाल -११.५१ %