कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान

मुख्यमंत्री सिद्धरामय्या

टीम महाराष्ट्र देशा : पूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. विधानसभेच्या 224 पैकी 222 जागांसाठी हे मतदान होणार आहे. सकाळी 7 पासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. 15 मे रोजी म्हणजे मंगळवारी कर्नाटकचा किल्ला कोण सर करणार हे कळणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याप्रमाणेच कर्नाटकातील दोन दिग्गज नेत्यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरमैय्या हे काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत, तर भाजपने एल येदियुरप्पा यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित केलं आहे.