विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या चार जागांसाठी आज मतदान

टीम महाराष्ट्र देशा : विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या चार जागांसाठी आज मतदान होणार आहे. यात मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदार संघाचा समावेश आहे.

या निवडणुकांमध्ये कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने मोठी प्रतिष्ठेची बनवली आहे. मुळचे राष्ट्रवादीचे असणारे निरंजन डावखरे हे आता भाजपचे उमेदवार असल्याने स्वतः शरद पवार यांनी या निवडणुकीत जातीने लक्ष घातले आहे. त्यामुळे हि निवडणूक अजूनच रंगतदार होणार आहे.

कोणत्या पक्षात कोण आहे उमेदवार

कोकण पदवीधरसाठी पक्ष आणि उमेदवार
भाजप : निरंजन डावखरे
राष्ट्रवादी काँग्रेस : नजीब मुल्ला
शिवसेना : संजय मोरे

मुंबई पदवीधर मतदार संघ – पक्ष आणि उमेदवार
भाजप : अॅड. अमितकुमार मेहता
शिवसेना : विलास पोतनीस
लोकभारती : जालिंदर सरोदे
अपक्ष ( मनसे स्वाभिमानी पुरस्कृत) : राजू बंडगर
अपक्ष : डॉ. दीपक पवार

मुंबई शिक्षक मतदारसंघ : पक्ष आणि उमेदवार
शिवसेना : शिवाजी शेंडगे
लोकभारती : कपिल पाटील
अपक्ष (भाजप पुरस्कृत) : अनिल देशमुख