राज्यसभेच्या ५८ जागांसाठी २३ मार्चला निवडणूक

अपंग विधेयक

टीम महाराष्ट्र देशा : एप्रिल-मे २०१८ भेतून निवृत्त होणाऱ्या खासदारांच्या जागांसाठी 23 मार्चला मतदान होणार आहे. यामध्ये १६ राज्यांतील राज्यसभेच्या 58 जागा असून महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश आहे.

अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १२ मार्च आहे. २३ तारखेला सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होईल. त्याच दिवशी संध्याकाळी 5 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल.

महाराष्ट्रातून निवृत्त होणारे खासदार

वंदना हेमंत चव्हाण – राष्ट्रवादी
डी. पी. त्रिपाठी – राष्ट्रवादी
रजनी पाटील – काँग्रेस
अनिल देसाई – शिवसेना
राजीव शुक्ला – काँग्रेस
अजयकुमार संचेती – भाजप

केंद्रीय मंत्री अरुण जेटली, जेपी नड्डा, रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर, कॉंग्रेस नेते प्रमोद तिवारी, राजीव शुक्ला, रेणुका चौधरी यांच्यासह अभिनेत्री रेखा आणि क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर राज्यसभेतून निवृत्त होणार आहेत

संख्याबळानुसार आता महाराष्ट्रात राज्यसभेवर सहापैकी भाजपचे 3 उमेदवार, तर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येऊ शकतो.