ईव्हीएम मशिनमध्ये गडबड वाटल्यास मतदारांनी तक्रार करावी ; प्रकाश आंबेडकरांचे आवाहन

prakash-ambedkar 06

टीम महाराष्ट्र देशा: मतदान केंद्रांवर मतदान यंत्रांमध्ये तांत्रिक बिघाड होण्याच्या तक्रारी येत आहेत असे समजताच कार्यकर्त्यांनी संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांकडे लेखी स्वरुपात तक्रार करावी तसेच सी व्हिजील अ;ॅपवरून थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करावी. असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. एवढेच नाही तर, जितका वेळ ईव्हीएम मशिन मशीन बंद आहे. तितका वेळ मतदानासाठी वाढवून देण्याची मागणीही करावी असेही त्यांनी सांगितले.

सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरु आहे. देशात आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. याचदरम्यान, अकोला लोकसभा मतदार संघामध्ये विविध मतदान केंद्रांवर मतदान यंत्रांमध्ये बिघाड होण्याच्या घटना घडत आहेत. यामुळे मतदान प्रक्रियेस उशीर होत आहे. इतकेच नव्हे तर, मतदान यंत्रांमध्ये बिघाड होण्याच्या प्रकारामुळे ईव्हीएम मशिन हॅक होण्याच्या चर्चाही होत आहेत.

दरम्यान, या लोकसभा निवडणुकीमध्ये मतदाना दरम्यान ईव्हीएम मशीनला व्हीव्हीपॅट मशिन जोडण्यात आले आहे. मतदानावेळी कोणताही गैरप्रकार किंवा घोटाळा होऊ नये यासाठी ही विशेष यंत्रणा जोडण्यात आली आहे. सोलापूर मतदार संघात या आतापर्यंत १४९  व्हीव्हीपॅट मशीन बदलण्यात आले आहेत. तसेच राज्यात दुपारी ११  वाजेपर्यंत २१.४७  मतदान झाले आहे.