विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी संपन्न

vidhan parishad shapat vidhi

नागपूर : पदवीधर व शिक्षक मतदारसंघातून महाराष्ट्र विधानपरिषदेवर सदस्य म्हणून निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांना विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी विधानपरिषदेत शपथ दिली.

या नवनिर्वाचित सदस्यांमध्ये कपिल हरिश्चंद्र पाटील, (मुंबई विभाग शिक्षक मतदारसंघ), निरंजन वसंत डावखरे, (कोकण विभाग पदवीधर मतदारसंघ), किशोर भिकाजी दराडे, (नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ), विलास विनायक पोतनीस, (मुंबई विभाग पदवीधर मतदारसंघ) यांचा समावेश आहे.यावेळी सभागृह नेते तथा महसूलमंत्री चंद्रकात पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व सदस्य उपस्थित होते.

माजी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांना विधानपरिषदेत श्रद्धांजली

पावसाळी अधिवेशन मुंबई ऐवजी नागपूराला का ? धनंजय मुंडेंचा सरकारला सवाल

विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या चार जागांसाठी आज मतदान

2 Comments

Click here to post a comment