मतदारांची माहिती आधारला लिंक करा; मुख्यमंत्री फडणवीसांचे निवडणूक आयुक्तांना पत्र

टीम महाराष्ट्र देशा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यांनी निवडणूक आयुक्तांना पत्र लिहून मतदारयादी आधार कार्डशी लिंक करावी अशी मागणी केली आहे.

अनेक वेळा मतदार यादीत घोळ होते तसेच बोगस मतदान झाल्याचाही अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. त्यामुळे खरा मतदार बाजूला राहतो त्याला मतदानाचा हक्क बजावता येत नाही. त्यामुळे मतदार यादीत पारदर्शकता यावी यासाठी जर मतदारयादी आधार कार्डशी लिंक केली तर या घटनांना आळा बसेल त्यामुळे फडणवीस यांनी मतदार यादी आधार कार्डशी लिंक करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाने मतदार यादी आधारशी जोडण्याचा निर्णय घेतला तर येणाऱ्या काळात येणाऱ्या निवडणुका पारदर्शी होण्यास मदत होणार आहे.