‘मतदारांचा विश्वासघात; निवडणूक आयोग बरखास्त करा’, काँग्रेसची मागणी

निवडणूक आयोग

नवी दिल्ली : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसचा दणदणीत पराभव झाला आहे. यानंतर आता काँग्रेसने विद्यमान निवडणूक आयोग बरखास्त करण्याची मागणी केली आहे. विधानसभा निवडणुकीत आयोगाने मतदारांचा विश्वासघात केला. त्यामुळे हा आयोग बरखास्त करून त्याच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईची चौकशी केली गेली पाहिजे, असे काँग्रेसने म्हटले आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी निवडणुकांतील निवडणूक आयोगाच्या व्यवहारामुळे काही गंभीर प्रश्न उपस्थित केलेत. या निवडणुकीत आयोगाने स्वत:ला अपमानित व मतदारांचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे विद्यमान आयोग भंग करून त्याच्या सदस्यांनी केलेल्या कारवाईचा तपास केला जावा, असे शर्मा यांनी सोमवारी एका निवेदनात म्हटले आहे.

आयोगाने कलम ३२४ अंतर्गत स्वतंत्र व निष्पक्ष निवडणूक घेण्यासाठी मिळालेल्या आपल्या घटनादत्त अधिकारांचे उल्लंघन केले आहे. बंगाल निवडणुकीतील आयोगाची कृती अत्यंत पक्षपाती, धक्कादायक व निंदनीय आहे. आयोगाने भाजपचा सहकारी म्हणून काम केल्याची अनेक उदाहरणे आहेत. राजकीय नेत्यांना हजारोंच्या प्रचार सभा घेण्याची परवानगी देऊन आयोगाने आपल्याच कोविड प्रोटोकॉल्सचे उल्लंघन केले. यामुळे देशात कोरोनाचा प्रसार होण्यास मदत झाली. या प्रकरणी आयोगाला जबाबदार धरले पाहिजे असे शर्मा म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या