रणजितसिंह मोहिते पाटील म्हणतात घड्याळाला मतदान करा

blank

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अनेक घडामोडी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यात जळगाव मधील अमळनेर येथे झालेला गोंधळ असो किंवा पुण्यातील राहुल गांधींच्या सभेतील मोदींच्या नावाच्या घोषणा असो. तसेच आता निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर केलेल्या नेत्यांचा गोंधळ उडताना दिसत आहे. कारण भाजप नेते रणजितसिंह मोहिते पाटील घड्याळाला मतदान करा असं म्हणतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

सांगोला येथे माढा मतदारसंघातील भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. नुकताच भाजप प्रवेश केलेल्या रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सभेत भाषण करताना अनावधानाने घड्याळाला मतदान करा अस वक्तव्य केलं. परंतु आपण विरोधी उमेदवाराच्या चिन्हाचा उल्लेख केल्याचं लक्षात येताच रणजितसिंह यांनाही हसू आवरता आलं नाही.

दरम्यान, रणजितसिंह मोहिते पाटील यांच्याकडून झालेल्या चुकीच्या वक्तव्यामुळे उपस्थितांमध्ये मोठा हशा पिकला.