Share

Volvo EX90 Launch | Volvo ची इलेक्ट्रिक SUV EX90 ‘या’ दिवशी होऊ शकते लाँच

टीम महाराष्ट्र देशा: देशामध्ये सध्या इलेक्ट्रिक (Electric) वाहनांचा ट्रेंड वाढत चालला आहे. त्यामुळे प्रत्येक वाहन उत्पादक कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन इलेक्ट्रिक कार लाँच करत आहे. अशा परिस्थितीत लक्झरी कार निर्माता कंपनी Volvo लवकरच आपली नवी इलेक्ट्रिक SUV भारतामध्ये लाँच (launch) करू शकते. मीडिया रिपोर्ट नुसार, Volvo आपली EX90 ही इलेक्ट्रिक SUV भारतीय बाजारांमध्ये 9 नोव्हेंबर 2022 रोजी लाँच करू शकते. कंपनीची ही एक इलेक्ट्रिक SUV असेल. जी SPA2 प्लॅटफॉर्मवर तयार केलेली आहे. त्याचबरोबर Volvo दरवर्षी आपले एक इलेक्ट्रॉनिक वाहन लाँच करण्याची योजना आखत आहे.

Volvo EX90 फिचर्स

Volvo च्या EX90 इलेक्ट्रिक SUV मध्ये अनेक नवीनतम फीचर्स असण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये Volvo नवीन स्मार्ट डॅशबोर्ड उपलब्ध करून देऊ शकते. त्याचबरोबर यामध्ये नेव्हिगेशन, मीडिया आणि फोन कंट्रोल्स यांसारखी मोठी सेंट्रल स्क्रीन सपोर्टिंग फीचर्स देखील असू शकतात. त्याचबरोबर या नवीन SUV मध्ये गुगलने विकसित केलेले ऑपरेटिंग सॉफ्टवेअर सुद्धा वापरण्यात आले आहे. हे सॉफ्टवेअर इंटिरियर ड्रायव्हरला स्पष्ट माहिती आणि डेटा देऊ शकते.

Volvo EX90 पॉवरपॅक

Volvo EX90 या SUV मध्ये XC40 रिचार्ज इलेक्ट्रिक कार सारखा बॅटरीपॅक पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट असल्याची माहिती मिळली आहे. या SUV मध्ये XC40 रिचार्ज 78kWh लिथियम-आयम बॅटरीपॅक सह सुसज्ज आहे. जे एका चार्जवर 418 किलोमीटर पर्यंत जाऊ शकते. त्याचवेळी 150kW DC फास्ट चार्जर च्या मदतीने फक्त 40 मिनिटांमध्ये ही SUV 0-80 टक्के चार्ज केली जाऊ शकते.

भारतीय बाजारपेठेत Volvo आखत आहेत ‘हे’ प्लॅन

मिळालेल्या माहितीनुसार, Volvo भारतीय बाजारामध्ये आपले वेगळे स्थान निर्माण करण्यासाठी मोठ्या योजनांवर काम करत आहे. या योजना अंतर्गत कंपनी दरवर्षी भारतामध्ये आपली इलेक्ट्रिक कार लाँच करणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, Volvo आपली Volvo EX90 9 नोव्हेंबर 2022 रोजी लाँच करणार आहे अशी माहिती समोर आली आहे.

महत्वाच्या बातम्या 

टीम महाराष्ट्र देशा: देशामध्ये सध्या इलेक्ट्रिक (Electric) वाहनांचा ट्रेंड वाढत चालला आहे. त्यामुळे प्रत्येक वाहन उत्पादक कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन …

पुढे वाचा

Cars And Bike