खंडाळ्याजवळ बसला भीषण आग

लोणावळा : बोरीवलीहून पुण्याला जाणा-या एका व्होल्वो बसला अचानक भीषण आग लागली. मुंबई-पुणे महामार्गावर खंडाळ्याजवळ अमृतांजन पुलाजवळ ही घटना घडली.

या आगीमध्ये नीता व्होल्वो या कंपनीची बस संपूर्ण जाळून खाक झाली. या बसमध्ये एकूण ४० प्रवासी होते. लाग लागल्याचे कळताच सर्व प्रवाशांनी बसबाहेर धाव घेतल्यामुळे सुदैवाने यात कोणताही जीवितहानी झाली नाही. दीड तासांच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.

या घटनेमुळे मुंबईहून पुण्याला जाणारी वाहतूक सुमारे दीड तास ठप्प झाली होती.

You might also like
Comments
Loading...