संघाच्या ‘जॉइन आरएसएस’ मोहिमेकरिता स्वयंसेवक रस्त्यावर

दर दोन मिनिटांमागे एक नवी नोंदणी होत असल्याचा कोकण प्रांत सहकार्यवाह विठ्ठल कांबळे यांचा दावा

मुंबई – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ‘जॉइन आरएसएस’ नावाची एक मोहीम संघाने सुरू केली आहे. संघ कार्यकर्त्यांनी गेल्या काही महिन्यांपासून मुंबई परिसरात सुमारे ४० ठिकाणी स्वयंसेवक ‘नोंदणी केंद्रे’ सुरू केली असून येत्या ७ जानेवारीस मुंबईसह कोकण प्रांतातील अशा नवागतांसोबत जागोजागी संघ परिचय मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत.गेल्या काही महिन्यांत बूथ नोंदणी तसेच ऑनलाइन मोहिमेस मोठा प्रतिसाद मिळाला असून दर दोन मिनिटांमागे एक नवी नोंदणी होत असल्याने संघविस्तारास पोषक वातावरण समाजात निर्माण झाले आहे, असा दावा कोकण प्रांत सहकार्यवाह विठ्ठल कांबळे यांनी केला आहे .

RSS

सध्या संघाविषयी समाजात मोठय़ा प्रमाणात उत्सुकता निर्माण झाली आहे. देशभर सुरू असलेली सेवाकार्ये तसेच शिक्षण, ग्रामविकास, आरोग्य, रोजगार आणि संस्कार आदी क्षेत्रांतील नियोजनबद्ध कामांमुळे संघाशी परिचित नसलेले अनेक जण संघाच्या कामात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त करू लागल्याने, सन २०१२ पासून संघाने ‘जॉइन आरएसएस’ ही ऑनलाइन मोहीमही सुरू केली आहे. संघाच्या संकेतस्थळावरून नोंदणी करून संघात सहभागी होण्याचा पर्याय या मोहिमेद्वारे देण्यात आल्याने मोठय़ा प्रमाणात नोंदणीची रीघ लागली आहे, असे कोकण प्रांत सहकार्यवाह विठ्ठल कांबळे यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.‘जॉइन आरएसएस’ मोहिमेचा भाग व ७ जानेवारीच्या ‘हिंदू चेतना संगम’ची पूर्वतयारी म्हणून, मुंबई परिसरात संघाच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी रस्त्यांवरदेखील नोंदणी केंद्रे उघडली आहेत. या केंद्रांवर नोंदणी अर्ज भरून देणाऱ्याशी त्यांच्या परिसरातील संघ कार्यकर्ते संपर्क साधत असून संघाच्या विविध उपक्रमांचा परिचय, संवाद, माहिती, शंकासमाधान आदी माध्यमांतून नवख्यांचे नाते संघाशी जोडले जात आहे.

You might also like
Comments
Loading...