कोविड-19 वरील लसीच्या चाचणीसाठी स्वयंसेवकांच्या नोंदणीला सुरुवात

corona vaccine

नवी दिल्ली- कोविड-19 च्या प्रतिबंधासाठी भारतात विकसित करण्यात आलेल्या कोव्हॅक्सिन या लसीच्या दिल्लीत, भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत केल्या जाणाऱ्या मानवांवरील चाचण्यांसाठी स्वयंसेवकाच्या नावनोंदणीस आजपासून सुरुवात झाली आहे.

आज पहिल्याच दिवशी या नावनोंदणीला मोठा प्रतिसाद मिळाला असून सुमारे 1800 अर्ज आले असल्याचं एम्सच्या डॉ. संजय राय यांनी सांगितलं. या लसीच्या चाचण्या घेण्याची ज्या संस्थांना मान्यता देण्यात आली आहे, त्यामध्ये प्रामुख्यानं दिल्लीच्या एम्सचा समावेश आहे.

देशात आज सकाळी संपलेल्या 24 तासात कोविड 19 चे 22 हजार 664 रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे आतापर्यंत बरे झालेल्या व्यक्तींची एकंदर संख्या 7 लाख 8 7 इतकी झाली आहे. देशातला रुग्ण बरे होण्याचा सरासरी दर आता 62 पूर्णांक 61 शतांश टक्के झाला आहे. सध्या एकंदर 3 लाख 90 हजार 459 रुग्णांवर देशभरात विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत.

गेल्या 24 तासात देशभरात 40 हजार 425 नवे कोरोनाबाधित आढळले असून कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून एकाच दिवसात एवढे कोविड रुग्ण आढळण्याची ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. देशात आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्या व्यक्तींची एकंदर संख्या 11 लाख 18 हजार 43 इतकी झाली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं देण्यात आली. काल दिवसभरात 6 शे 81 रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे कोविडमुळे दगावलेल्या व्यक्तींची एकंदर संख्या आता 27 हजार 497 वर पोहोचली आहे. आकाशवाणीने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

महत्वाच्या बातम्या-

पुणे : उपचार मिळण्यात प्रचंड अडचणी; ‘आप’चे मनपा आयुक्त कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन

जयंत पाटील हा अत्यंत तज्ञ, बुद्धिवान आणि पंडित माणूस, पडळकरांचा जोरदार टोला

मी मुख्यमंत्र्यांवर टीका केली नाही केवळ सल्ला दिला, पृथ्वीराज चव्हाणांनी दिले स्पष्टीकरण

‘मला ३५ कोटी रुपयांची ऑफर दिली होती,मात्र तरीही मी कॉंग्रेस सोडली नाही’

…तर विरोधकांनी काहीही न खाता-पिता मोदी सरकार एव्हाना पाडलं असतं – सुधीर मुनगंटीवार