१६ रुपयांत मिळवा अनलिमिटेड 3G, 4G डेटा

नवी दिल्ली – व्होडाफोन कंपनीने नव्या वर्षात आपल्या ग्राहकांसाठी एक धमाकेदार ऑफर आणली आहे. या ऑफरनुसार व्होडाफोनच्या युझर्सला केवळ १६ रुपयांत एका तासासाठी 3G, 4G डेटा मिळणार आहे.

१६ रुपयांत मिळणार 3G, 4G डेटा

व्होडाफोनच्या या नव्या ऑफरनुसार एक तासासाठी केवळ १६ रुपयात अनलिमिटेड 3G, 4G डेटा मिळणार आहे. याशिवाय पाच रुपयांत एका तासासाठी अनलिमिटेड 2G डेटा तसेच सात रुपयांत लोकल सर्कलमध्ये व्होडाफोन टू व्होडाफोन अनलिमिटेड कॉलचीही ऑफर देण्यात आली आहे.

‘सुपरआवर’ असं या नव्या ऑफरचं नाव असून शुक्रवारी या प्लॅनची घोषणा करण्यात आली. व्होडाफोनची ही नवी ७ जानेवारी रोजी लॉन्च होईल, तर ९ जानेवारीपासून ग्राहकांसाठी सेवा उपलब्ध होईल. वेगवेगळ्या सर्कलमध्ये याचे दर वेगळे असतील असंही कंपनीनं जाहीर केलं आहे.

You might also like
Comments
Loading...