दहशतवाद्यांनी हत्या केलेल्या भारतीयांचे मृतदेह आणण्यासाठी व्ही के सिंग इराकला रवाना

नवी दिल्ली: परराष्ट्र राज्यमंत्री व्ही के सिंग ‘आयसिस’च्या दहशतवाद्यांनी हत्या केलेल्या ३९ भारतीयांचे मृतदेह आणण्यासाठी इराकला रवाना होत आहेत. हत्या झालेल्या सर्व भारतीयांचे मृतदेह उद्या भारतात आणले जाणार आहेत. वायुसेनेच्या मदतीने भारतीयांच्या मृतदेहांचे अवशेष अमृतसरला आणले जातील. त्यानंतर पटना आणि कोलकाताला नेले जातील.

आयसिसच्या दहशतवाद्यांनी इराकमध्ये भवन निर्माता कंपनीसाठी काम करणाऱ्या ४० भारतीयांचे २०१४ मध्ये अपहरण केलं होते. नुकतंच या मृतदेहांच्या सापडलेल्या अवशेषांची डीएनए तपासणी पूर्ण झाली. त्यानंतर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी या हत्यांबाबत अधिकृतरित्या माहिती संसदेत दिली होती.

You might also like
Comments
Loading...