Share

Vivo Mobile Launch | भारतात लवकरच लाँच होणार Vivo चा ‘हा’ Mobile

टीम महाराष्ट्र देशा: जगभरातील मोबाईल (Mobile) उत्पादक कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन तंत्रज्ञानासह आपले नवीन मॉडेल्स बाजारात लाँच करत असते. यामुळे टेलिकम्युनिकेशन इंडस्ट्रीमध्ये दिवसेंदिवस स्पर्धा वाढत चालली आहे. त्यामुळे प्रत्येक टेलीकम्युनिकेशन कंपनी आपल्या आपल्या प्रॉडक्ट्सवर अधिक बारकाईने काम करते. मोबाईल उत्पादक कंपनी विवो (Vivo) सुद्धा आपल्या नवीन मॉडेलवर काम करत आहे. त्याचबरोबर विवो लवकरच भारतात आपला Vivo Y01A मोबाईल लाँच करण्याच्या तयारीत आहे. विवोने आपला हा स्मार्टफोन थायलंडमध्ये लाँच केला होता. त्यानंतर आता विवो हा फोन भारतामध्ये लॉंच करणार आहे.

Vivo Y01A फीचर्स

Vivo Y01A हा मोबाईल MediaTek Helio प्रोसेसरसह सुसज्ज आहे. त्याचबरोबर या फोनमध्ये 2 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटरनल स्टोरेज उपलब्ध आहे. या मोबाईलला 1600×720 पिक्सेल रिझोल्युशन आणि 6.51 इंच IPS HD+ डिस्प्ले उपलब्ध आहे. या फोनच्या कॅमेरा बद्दल बोलायचे झाले, तर यामध्ये फ्रंट फेसिंग 5 मेगापिक्सल कॅमेरा वॉटर ड्रॉप नॅचसह उपलब्ध आहे. त्याचबरोबर या फोनमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर फीचर ऐवजी आय पावर्ड फेस अनलॉक दिलेले आहे.

Vivo Y01A हा मोबाईल Android 11 वृत्तीवर आधारित आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, यात 4G VoLTE, ड्युअल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ 5.0 आणि GPS उपलब्ध आहे. त्याचबरोबर या फोनमध्ये 10W चार्जिंगवर 5,000mAh बॅटरी उपलब्ध आहे.

किंमत

Vivo Y01A 5G थायलंड मधील कंपनीच्या वेबसाईटवर या स्मार्टफोनची किंमत THB 3,999 म्हणजेच भारतीय किमतीनुसार 9,100 रुपये सूचीबद्ध केले आहे. त्याचबरोबर हा स्मार्टफोन सर्वात स्वस्त फोनच्या सेगमेंटमध्ये ठेवण्यात आलेला आहे. दरम्यान, कंपनीकडून अद्यापही स्मार्टफोनच्या भारतातील लॉन्चिंग बद्दल कुठलीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. पण हा फोन लवकरच भारतात लाँच केला जाऊ शकतो.

महत्वाच्या बातम्या 

टीम महाराष्ट्र देशा: जगभरातील मोबाईल (Mobile) उत्पादक कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन तंत्रज्ञानासह आपले नवीन मॉडेल्स बाजारात लाँच करत असते. यामुळे …

पुढे वाचा

Mobile

Join WhatsApp

Join Now