पुढील पाच वर्षांसाठी व्हिवो असणार आयपीएल स्पॉन्सर

मुंबई : अप्लावधीत क्रिकेट प्रेमींसाठी पर्वणी ठरलेल्या आयपीएलच्या स्पॉन्सरशीपसाठी चायनीज मोबाईल कंपनी व्हिवोन तब्बल २१९९ कोटी रुपये म्हणजेच प्रत्येक वर्षी ४४० कोटी रुपये दिले आहेत. व्हिवो पुढच्या पाच वर्षांसाठी आयपीएलची स्पॉन्सर असणार आहे.

२०१५सालीही व्हिवोलाच आयपीएलची स्पॉन्सरशीप मिळाली होती . त्यावेळी दोन वर्षांसाठी व्हिवोनं २०० कोटी रुपये दिले होते. आयपीएलच्या स्पॉन्सरशीपसाठी १ ऑगस्ट २०१७ ते ३१ जुलै २०२२ या कालवधीसाठी टेंडर मागवण्यात आले होते.

२००८ मध्ये डीएलएफला पाच वर्षांसाठी आयपीएलची स्पॉन्सरशीसाठी प्रत्येक वर्षासाठी 40 कोटी मोजले होते.  तर २०१२मध्ये पेप्सीला ३९६ कोटी रुपयांमध्ये पाच वर्षांसाठी  आयपीएलची स्पॉन्सरशीप मिळाली होती . २०१६मध्ये पेप्सीने करार रद्द केल्याने व्हिवोला आयपीएलची स्पॉन्सरशीप मिळाली. आता पुन्हा एकदा पुढील पाच वर्षांसाठी व्हिवोकडे स्पॉन्सरशीप असणार आहे.

You might also like
Comments
Loading...