fbpx

सलमानच्या माफीच्या प्रतीक्षेत विवेक ओबेरॉय !

टीम महाराष्ट्र देशा : २००३ मध्ये विवेकने पत्रकार परिषद बोलवून सलमान खानवर खळबळजनक आरोप केले होते. या गोष्टीला १६ वर्षे पूर्ण झाली आहेत परंतु सलमानने विवेकला अजूनही माफ केलेले नाही.

एका मुलाखतीमध्ये विवेकला सलमानला तुला काही विचारायचे झाल्यास, तू काय विचारशील? असा प्रश्न करण्यात आला. त्यावर तू माफ करण्यावर विश्वास ठेवतोस का? हा एकच प्रश्न मी सलमानला विचारेल, असे विवेकने उत्तर दिले. आता त्यावर सलमान खान काय प्रतिक्रिया देतोय याचीच सर्वजण उत्सुकतेने वाट पाहताहेत.

काय झाले होते २०१३ मध्ये ?

विवेक ओबेरॉय आणि सलमान खान यांच्या भांडणाचे कारण ऐश्वर्या राय होती. ‘हम दिल दे चुके सनम’ च्या सेटवर सलमानचे ऐश्वर्यासोबत अफेयर सुरु होते. जवळपास दोन वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्यांचे ब्रेकअप झाले. त्यावेळी ऐश्वर्याने सलमानवर मारहाण केल्याचा आरोप केला होता. त्यांनतर ऐश्वर्या आणि विवेक यांच्यातील जवळीक वाढली. याचदरम्यान विवेकने अचानक एक पत्रपरिषद बोलवून सलमानवर जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला होता. या पत्रपरिषदेनंतर विवेक व सलमान कायमचे वैरी बनले. पुढे विवेक व ऐश्वर्याचेही ब्रेकअप झाले.