मुंबई : नवी दिल्लीत राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2022 च्या विजेत्यांची घोषणा करण्यात आली. या वर्षी भारतातील अनेक उत्कृष्ट चित्रपटांना या यादीत स्थान मिळाले आहे. साउथ सुपरस्टार सुर्याचा ‘सूरराई पोत्रू’ या चित्रपटाने पुरस्कारांवर अधिराज्य गाजवले. त्याचबरोबर संजय दत्तच्या ‘तुसलीदास ज्युनियर’ या चित्रपटालाही सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. तसेच अजय देवगणच्या ‘तान्हाजी’ने ही अनेक पुरस्कार जिंकले. या दरम्यान, चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री यांनी बॉलीवूडवर निशाणा साधला आहे. तसेच विवेक यांच्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाला पुरस्कार न मिळाल्यामुळे नेटकरी विवेक यांना ट्रोल देखील करत आहेत.
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाल्यांनतर विवेक अग्निहोत्री यांनी ट्विट करत अजय देवगणसह दाक्षिणात्य कलाकारांचे अभिनंदन केले आणि बॉलिवूडला एक मोठा सल्लाही दिला आहे. या ट्विटमध्ये विवेक यांनी लिहिले की, ‘सूरराई पोत्रू, सूर्या, अपर्णा बालमुरली, सुधा कोंगारा आणि अजय देवगण यांना राष्ट्रीय पुरस्कार जिंकल्याबद्दल खूप खूप अभिनंदन. साउथचा सिनेमा आणि सर्व प्रादेशिक चित्रपटांसाठी हा दिवस चांगला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीला अधिक मेहनत करण्याची गरज आहे.” या ट्विटमधून विवेक यांनी बॉलीवूडला दिलेल्या सल्ल्यावर अनेक नेटकऱ्यांनी सकारात्मक कॉमेंट्स केल्या. मात्र काहींनी विवेक यांनाच ट्रोल केले.
कश्मीरी पंडितांवर झालेल्या अन्यायावर आधारित ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटानंतर या चित्रपटाचे निर्माते विवेक अग्निहोत्री हे चर्चेत आले होते. या चित्रपटावरून राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले होते. यात दाखवलेला इतिहास खरा कि खोटा यावर अनेक वाद झाले. अनेक राज्यांनी हा चित्रपट टॅक्स फ्री केला होता. त्यामुळे या चित्रपटाला पुरस्कार मिळेल अशी अपेक्षा अनेक जणांना होती.
महत्वाच्या बातम्या:
- Raj Thackeray : उद्धव ठाकरे विश्वास ठेवण्यासारखे नाहीत, ते बोलतात एक आणि करतात दुसरेच; राज ठाकरेंचा टोला
- Girish Mahajan | भारतीय जनता पक्षाला संपवण्याचं कटकारस्थान रचलं गेलेलं – गिरिश महाजन
- Neeraj Chopra : नीरज चोप्राच्या ऐतिहासिक कामगिरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह ‘या’ बड्या नेत्यांनी दिल्या शुभेच्छा
- viral video | पुन्हा घडला तोच प्रकार; तिरुमाला देवस्थानने काढायला लावली शिवाजी महाराजांची मूर्ती
- Praniti Shinde | बटणावरील मतदानाने सगळे बिघडले, आता शिक्काच हवा – प्रणिती शिंदे
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<