‘विठ्ठल विठ्ठल..माउली विठ्ठल..’ आषाढीनिमीत्त केदार शिंदेनी केले ट्विट

kedar shinde

मुंबई : २० जुलै रोजी आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्र तसेच शेजारील राज्यातील वारकरी पायी चालत पंढरपुरला येतात. मात्र कोरोना संसर्गामुळे सलग दुसऱ्या वर्षी पायी वारीला सरकारने परवानगी नाकारली आहे. यामुळे भावीक जवळ असलेल्या विठ्ठलाच्या मंदिरात दर्शन घेत आहेत.

महाराष्ट्राचे कुलदैवत असलेले विठ्ठल हे सर्वसामान्यांचे, कष्टकऱ्यांचे दैवत आहेत. विठ्ठलाच्या भेटीला हजारो वारकरी पायी पंढरपूर चालत जातात. मात्र कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमिवर मागील वर्षीप्रमाणे यदांच्या वारीवर प्रशासनाने बंदी घातली. वारीवर जरी बंदी आली तरी मात्र विठ्ठलाची भक्ती आणि उत्साह कायम आहे.

याच पार्श्वभूमिवर कलाकार सोशल मीडियावरून आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देत आहेत. मराठी चित्रपटातील लेखक तसेच दिग्दर्शक केदार शिंदे यांनी देखील आपल्या अधिकृत ट्विटरवर एक फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्यासह अनेक मराठी कलाकारांनी देखील सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

IMP