ऊद्या विठ्ठल सह.सा. कारखाना बंद ठेवणार – आ. बबनराव शिंदे

कुर्डूवाडी प्रतिनीधी – हर्षल बागल : सकल मराठा क्रांती मोर्चाने ऊद्या 9 आँगस्ट रोजी महाराष्ट्र बंद हाक दिलेली आहे. मराठा आरक्षणासाठी हा बंद असल्यामुळे माढा विधानसभेचे आमदार बबनराव शिंदे यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखाना देखील बंद ठेवुन ऊद्याच्या बंद मध्ये सहभागी होत असल्याची माहिती महाराष्ट्र देशा ला दिली. अशा आशयाचे परिपत्रकच कारखाण्याच्या संचालक टीम ने काढले आहे.

महाराष्ट्र सध्या आरक्षणाच्या मुद्यावरुन धुसफुसत आहे. अनेक आंदोलकांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. सरकारने गुन्हे माघार घेऊन आरक्षणावर लवकर तोडगा काढुन तापलेला महाराष्ट्र शांत करावा असे बोलताना आ. शिंदे यांनी सागिंतले.आंदोलकांनी शांततेत बंद करावा, जाळपोळ , तोडफोड आदी गोष्टी टाळाव्यात विशेष करुन तरुणांनी सयंम पाळावा असा सल्ला बबनराव शिंदे यांनी दिला आहे.

राज्यसभेच्या उपसभापती पदासाठी कॉंग्रेसचे बी. के. हरिप्रसाद रिंगणात