fbpx

शेतकरी कर्जमुक्तीसाठी शक्ती दे –  मुख्यमंत्री

पंढरपूर : राज्यातील शेतकरी कर्जमुक्त होऊ दे, असं साकडं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज, मंगळवारी विठुरायाकडे घातलं आहे. राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलीच आहे. पण शेतकरी कर्जमुक्त होणार नाही तोपर्यंत तो सुखी होणार नाही. त्याला कर्जमुक्त करता यावं, यासाठी आम्हाला शक्ती दे, असंही फडणवीस म्हणाले. आषाढी – एकादशीनिमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आज पहाटे पंढरपूर येथे विठ्ठल -रखुमाईची सपत्नीक पूजा केली. पूजेनंतर त्यांनी विठुरायाला साकडं घातलं.

बुलडाण्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील बाळसमुद्र गावातील मेरत दाम्पत्य महापूजेचे मानकरी ठरले मुख्यमंत्र्यासमवेत मेरत दाम्पत्यानं पांडुरंगाची पूजा केली. मध्यरात्री दोनच्या सुमारास महापुजेला सुरुवात झाली होती. तब्बल दीड तास पूजा विधी सुरू होते. त्यानंतर मंदिर लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी खुलं करण्यात आलं.

आषाढी-एकादशीनिमित्त पंढरपुरात पांडुरंग आणि वारकरी भेटीचा अनोखा सोहळा ‘याचि देही…’ अनुभवायला मिळाला. प्रथेप्रमाणं मुख्यमंत्र्यांनी आज पहाटे विठ्ठल-रखुमाईची सपत्नीक पूजा केली. विठ्ठलाला दुग्धाभिषेक करून महापूजा केली.