शिवसेनेच्या आमदाराच्या कार्यालयावर नगरपालिकेचा बुलडोझर

शिवसेनेच्या आमदाराच्या कार्यालयावर नगरपालिकेचा बुलडोझर

MLA Anil Babar

सांगली: शिवसेनेचे आमदार अनिल बाबर (Anil Babar) यांच्या नेतृत्वाखालील खानापूर तालुका खरेदी विक्री संघाच्या विटा (Vita)येथील जुन्या इमारतीवर विटा नगरपालिकेने बुलडोझर चालवला आहे. या पालिकेवर राष्ट्रवादीचे माजी आमदार सदाशिवराव पाटील (Sadashivrao Patil) यांची सत्ता आहे. सदाशिवराव पाटील आणि आमदार अनिल बाबर यांच्यात मतभेद आहेत त्याच सोबत त्यांच्यात राजकीय संघर्ष देखील खूप जुना आहे. राजकीय संघर्षामुळेच ही कारवाई करण्यात आली का, अशी चर्चा देखील सुरू होती.

नगरपालिकेने या आधी तीन वेळा नोटिस देखील बजावली होती मात्र कुठलीही कारवाई करण्यात आली नव्हती. त्यामुळे नगरपालिकेने थेट बुलडोझर आणून इमारत पाडण्याची कारवाई केली आहे. हे राजकीय संघर्षामुळे असल्याची चर्चा होत होती मात्र अखेर त्या चर्चेला पूर्णविराम देण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार सदाशिवराव पाटील आणि शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांच्यात राजकीय मतभेद असले तरी देखील या कारवाई मागे कसलेही राजकीय कारण नाहीये.

विट्यातील साळसिंगे रस्त्यावर खानापूर तालुका खरेदी विक्री संघाची इमारत आहे. ही इमारत जुनी आहे. याआधी विट्यात एका जुन्या इमारतीचा अपघात झाला. त्यात एकजण गंभीर जखमी झाला आणि एका महिलेचा मृत्यू झाला. याबाबतचा आढावा घेत असताना आयएएस अधिकारी असेलेले प्रभारी मुख्याधिकारी विशाल नरवाडे (Vishal Narwade) यांनी माहिती घेतली. त्यात अनेक इमारती धोकादायक असल्याचे आढळले. या संस्थेलाही तीनवेळा नोटीस बजावल्या. त्यांनी इमारत पाडून घेतो, असे सांगितले होते, मात्र ते झाले नाही. त्यामुळे कारवाई करावी लागल्याचे नरवाडे यांनी स्पष्ट केले.

महत्वाच्या बातम्या: