fbpx

‘आभार मानायला अन मनं जिंकायला येतोय’ आजपासून शिवसेनेची जनसंवाद यात्रा

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी संपली आहे. लोकसभेला भाजप-शिवसेनेच्या पारड्यात प्रचंड बहुमत टाकले आहे. याच्यातूनच उतराई होण्यासाठी आणि आगामी विधानसभा निवडणुका डोळयासमोर ठेऊन मुख्यमंत्री फडणवीसांनी ‘फिर एक बार शिवशाही सरकार’ चा नारा देत राज्यात सर्वसामान्यांशी संवाद साधण्याकरिता ‘जनसंवाद’ यात्रेची घोषणा केली. मुख्यमंत्र्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत शिवसेनेचीदेखील राज्यात आजपासून ‘जनआशीर्वाद’ यात्रा चालू होत आहे.

ज्यांनी मत दिली त्यांचे आभार मानायचे आहेत… ज्यांनी नाही दिली त्यांची मनं जिंकायची आहेत, असा मानस ठेऊन ही यात्रा काढण्याचं शिवसेनेने ठरवलंय. शिवसेनेच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून या यात्रेची माहिती देण्यात आली आहे.