Share

Snowfall Destination | भारतामध्ये सर्वोत्तम बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी ‘या’ ठिकाणांना द्या भेट

टीम महाराष्ट्र देशा: हिवाळा (Winter) मधील  वातावरण हे फिरण्यासाठी (Travel) उत्तम वातावरण असते. त्यामुळे हिवाळ्यामध्ये पर्यटक फिरण्यासाठी वेगवेगळे पर्याय शोधायला लागतात. त्याचबरोबर या वातावरामध्ये लोक हिल स्टेशनला भेट देतात कारण या महिन्यातील हिल्स स्टेशनला भेट देण्याची मजा वेगळीच असते. त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये लोक प्रामुख्याने बर्फवृष्टी (Snowfall) कडे आकर्षित होतात. काही लोक हिमवर्षाच्या नावाने थरथर कापतात तर काही लोकांना त्यामध्ये मजा वाटते. त्यामुळे या वातावरणात तुम्ही हिम वर्षावयाची मजा घेण्याचा प्लॅन करत असाल तर या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला काही ठिकाणी बद्दल माहिती सांगणार आहोत. या ठिकाणी तुम्ही भारतातील सर्वोत्तम हिमवर्षावाचा आनंद घेऊ शकता.

उत्तराखंड

भारतातील उत्तराखंड राज्य हे निसर्गसौंदर्याने नटलेले असून येथे अनेक ठिकाणी बघण्यासारखे आहे. उत्तराखंडमध्ये लोक प्रामुख्याने ऋषिकेश, हरिद्वार या ठिकाणांना भेट देतात. पण हिवाळ्यामध्ये हिमवर्षावाचा आनंद घेण्यासाठी उत्तराखंडमध्ये अनेक ठिकाण आहेत. येथील ऑली, मसुरी इत्यादी ठिकाणी तुम्ही हिमवर्षावाचा आनंद घेऊ शकता. त्याचबरोबर उत्तराखंड मधील अनेक गावं हिवाळ्यामध्ये बर्फाखाली झाकलेली असतात. हिमवर्षावाचा आनंद घेण्यासाठी उत्तराखंड मध्ये तुम्हाला अनेक बजेट डेस्टिनेशन सापडतील. या ठिकाणांना पर्यटक हिवाळ्यामध्ये मोठ्या संख्येने भेट देतात.

जम्मू आणि काश्मीर

धरतीवरील स्वर्ग म्हणून ओळख असलेल्या जम्मू-काश्मीर हे हिवाळ्यामध्ये खरंच एखाद्या स्वर्गाप्रमाणे दिसते. तुम्हाला जर सर्वोत्तम हिमवर्षावाचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही जम्मू काश्मीर ट्रीप प्लॅन करू शकता. काश्मीर खोऱ्यातील गुलमर्ग, सोनमर्ग, पहालंगम या ठिकाणी तुम्ही सर्वोत्तम बर्फवृष्टीचा आनंद घेऊ शकता. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही अनेक मोसमी एडवेंचर देखील करू शकता.

लडाख

लडाख हे ठिकाण सर्व पर्यटकांच्या आवडत्या ठिकाणांपैकी एक आहे. या ठिकाणी मे ते ऑक्टोबर दरम्यान भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ मानला जातो. पण तुम्हाला जर लडाख मधील हिमवर्षावाचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही नोव्हेंबर किंवा डिसेंबर मध्ये येथे ट्रीप प्लान करू शकता. या ठिकाणी खूप थंडी असते पण येथे तुम्ही सर्वोत्तम बर्फवृष्टीचा आनंद घेऊ शकता.

महत्वाच्या बातम्या 

टीम महाराष्ट्र देशा: हिवाळा (Winter) मधील  वातावरण हे फिरण्यासाठी (Travel) उत्तम वातावरण असते. त्यामुळे हिवाळ्यामध्ये पर्यटक फिरण्यासाठी वेगवेगळे पर्याय शोधायला …

पुढे वाचा

Travel

Join WhatsApp

Join Now