भेट ठरली… राज ठाकरे घेणार राहुल गांधींची भेट

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहे, तसतसं राजकीय घडामोडींना वेग येत आहे. आता या राजकीय घडामोडींमध्ये नवा ट्विस्ट आला आहे. राहुल गांधी हे पप्पू नसून परम पूज्य झाले आहेत असे स्तुतीसुमने उधळणारे राज ठाकरे आता थेट राहुल गांधी यांच्या भेटीला जाणार आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत. येत्या 8 तारखेला राज आणि राहुल यांची भेट होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांच्या मध्यस्थीने ही राहुल-राज भेट होणार आहे. नवी दिल्लीत काँग्रेस कार्यालयात किंवा राहुल गांधी यांच्या निवासस्थानी ही भेट प्रस्तावित आहे.

पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर राज ठाकरे यांनी राहुल गांधी यांची जाहीर भाषणात स्तुती केली होती. भाजपने राहुल गांधींवर केलेल्या टीकेला राज ठाकरे यांनी उत्तरं दिली होती. राज ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल करताना एक प्रकारे प्रमुख विरोधी पक्षाची भूमिका बजावली होती.