कुमार विश्वास आम आदमी पार्टीला राम राम ठोकण्याच्या तयारीत

kumar-vishwas

आम आदमी पार्टीला (आप) अखेर राज्यसभेसाठी उमेदवार मिळाले असून पक्षाचे नेते संजय सिंह, सुशील गुप्ता, एन. डी. गुप्ता या तिघांना उमेदवारी देण्यात आली आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.राज्यसभेचे तिकीट हुकल्याने तसेच अरविंद केजरीवाल यांच्याशी सुरु असलेल्या मतभेदांवरून नाराज असलेले आप नेते कुमार विश्वास पार्टी सोडण्याच्या तयारीत आहेत.

आप कडून राज्यसभेसाठी उमेदवारांची घोषणा केल्यानंतर कुमार विश्वास यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे.पक्षाच्या स्थापनेपासून पक्षाला मोठं करण्यासाठी ज्यानी काम केलं त्यांनाच डावलण्यात आल्याचा आरोप विश्वास यांनी केला आहे. बुधवारी राज्यसभा उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी पक्षाची बैठक झाली. सुत्रांच्या माहितीनुसार, कुमार विश्वास आणि अशुतोष यांना या बैठकीसाठी बोलावण्यात आले नव्हते.पक्षनेतृत्वावर हल्लाबोल करताना विश्वास यांनी पक्ष उभा करताना जी मदत केली त्याच मला हे बक्षीस मिळालं असल्याचं म्हटलं आहे.