महाडिकांची सत्ता पालटणाऱ्या पाटलांना बक्षीस; थेट गोकुळच्या अध्यक्षपदी लागली वर्णी !

गोकुळ

कोल्हापूर : ४ मार्च रोजी गोकुळ दूधसंघाच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. तब्बल ३० वर्षांनी गोकुळ मध्ये सत्तापालट झाला असून गृहराज्यमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या गटाने महादेवराव महाडिक यांच्या गटाला मोठा धक्का दिला आहे. पाटील-मुश्रीफ यांच्या गटाला जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी पाठींबा दिला होता.

यासोबतच, १७-४ असा एकहाती विजय मिळवत पाटील-मुश्रीफ यांच्या गटाने जिल्ह्यातील वर्चस्व दाखवून दिलं आहे. दरम्यान, या निवडणुकीआधी महाडिक गटातील एक हुकमी एक्का सतेज पाटलांच्या आघाडीत गेला. हा हुकमी एक्का म्हणजे विश्वास पाटील. विश्वास पाटील यांना संचालक पदाचा अनुभव आहे. महाडिकांची सत्ता पालटवण्यात विश्वास पाटील यांचा मोठा हात असल्याने आता त्यांना बक्षीस देण्यात आलं आहे.

गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली. गोकुळच्या अध्यक्षपदासाठी अरुण डोंगळे आणि विश्वास पाटील यांच्यात चुरस होती. यात विश्वास पाटील यांचं पारडं जड ठरलं आहे. गोकुळ दूध संघाच्या गोकुळ शिरगाव एमआयडी कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. संचालक मंडळाच्या बैठकीत विश्वास पाटील यांच्या निवडीवर शिक्कमोर्तब झाले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP