डॉल्बी साऊंड सिस्टीम लावल्यास कारवाई केली जाणारच- नांगरे-पाटील

vishwas nagre patil

टीम महाराष्ट्र देशा- आमचा गणेश भक्तांवर नाही, तर समाजातील वाईट प्रवृत्तीला विरोध आहे.आम्ही उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणार आहोत, त्यामुळे डॉल्बी साऊंड सिस्टीम लावल्यास कारवाई केली जाणारच आहे. अशा शब्दांत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी पोलिसांची भूमिका स्पष्ट केली. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्यांच्या आढावा बैठकीनिमित्ताने पोलिस महानिरीक्षक नांगरे-पाटील मंगळवारी सोलापूरमध्ये आले होते. यावेळी पोलिस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

‘जब तक है गणपती तब तक बजेगी डॉल्बी’ – उदयनराजे भोसले

विश्वास नांगरे-पाटील यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे

  • गणपती मंडळांनीदेखील संघर्षाची भूमिका घेऊ नये
  • आमचा गणेश भक्तांवर नाही, तर समाजातील वाईट प्रवृत्तीला विरोध आहे.
  • पाचही जिल्ह्यांतील गणपती मंडळांनी सीसीटीव्ही बसवावेत. त्यामुळे गैरप्रकाराला आळा बसेल.
  • आम्ही फक्त कारवाईच करत नाही, तर समस्या मुळापासून संपून जनजागृतीसाठी प्रयत्नशील आहोत
  • गणपती उत्सवात लाखो युवक एकत्र येतात. त्यांची क्रयशक्ती रचनात्मक उपक्रमात वापरावी.
  • आजपर्यंत आम्ही दोन वर्षांत 96 टोळ्यांना मोक्का, 636 गुन्हेगारांवर कारवाई, 351 टोळ्या तडीपार, 17 जणांना स्थानबद्ध, निर्भया पथकाच्या माध्यमातून 62 हजार 165 वर कारवाई, 58 हजार 638 जणांना समुपदेशन, त्यासाठी 5 हजार 405 जनजागृतीचे कार्यक्रम घेतले आहेत.