नांगरे-पाटलांच्या शब्दांवर जनतेचा ‘विश्वास’

vishwas nagre patil

टीम महाराष्ट्र देशा- कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या शब्दाला किती वजन आहे याचा प्रत्यय गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांना आला. आज वढू बुद्र्क, कोरेगाव-भीमा, सणसवाडी व शिक्रापूर येथील परिस्थितीतीची पाहणी करण्यासाठी आज गृहराज्यमंत्री दिपक केसरकर आले होते.उपस्थित जनसमुदायाच्या आग्रहावरून त्यांनी त्याठिकाणी असणाऱ्या नागरिकांशी तसेच काही लोकप्रतिनिधींशी संवाद साधला मात्र काही प्रश्नांची समाधानकारक उत्तरं न मिळू शकल्याने काहीअंशी तणावाची स्थिती निर्माण झाली होती मात्र नांगरे पाटलांनी मध्यस्थी करत जमावाला विशासात घेत शांत राहण्याचे आवाहन केले आणि काही क्षणातच साहेबांच्या शब्दावर विश्वास ठेवत संतप्त जमाव शांत झाल्याचे चित्र आज पहायला मिळाले.

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणाचे पडसाद महाराष्ट्रभरात उमटले आहेत.या पार्श्वभूमीवर वढू बुद्र्क, कोरेगाव-भीमा, सणसवाडी व शिक्रापूर येथील परिस्थितीतीची पाहणी करण्यासाठी गृहराज्यमंत्री दिपक केसरकर आले होते त्याठिकाणी उपस्थित असणाऱ्या जनसमुदायाच्या भावना केसरकर यांनी एकूण देखील घेतल्या मात्र एक ना अनेक प्रश्नांनी गृहराज्य मंत्री दिपक केसरकर यांना स्थानिक नागरिकांनी सतावताच कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी प्रसंगावधान दाखवत जमावाला शांत केले.त्यामुळे जनतेचा विश्वास हा नांगरे पाटलांवर किती मोठ्या प्रमाणात आहे याची कल्पना मंत्रीमहोदयांना आली .

काय म्हणाले विश्वास नांगरे पाटील ज्यामुळे स्थानिक शांत झाले ?

मी विश्वास नांगरे पाटील, कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचा विशेष पोलिस महानिरीक्षक, मी या पूर्वी आपल्याकडे जिल्हा पोलिस अधिक्षक म्हणूनही काम केले आहे. त्यामुळे मी परिस्थिती जाणतो. तुम्ही काळजी करु नका, माझ्यावर विश्वास ठेवा, मी आपल्याला विश्वास देतो की, सर्व काही कायदेशीर आणि प्रत्येकाला न्याय देण्याच्या भूमिकेने होईल..