राजकीय गोटात खळबळ : विश्वास नांगरे पाटील पवारांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

vishwas nangre vs dhananjay munde

मुंबई : एकापाठोपाठ एक अशा राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांच्या अडचणी वाढत आहेत. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाअध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर एका महिलेने अत्याचाराचे आरोप केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते व मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर देखील त्यांच्याशी संबंधित एका महिलेने आरोप करून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ माजली असतानाचएनसीबीने राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना देखील काल रात्री अटक केली आहे. तर, दुसऱ्याबाजूला भाजप आक्रमक झाली असून पोलिसांनी धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेची तक्रार रीतसर निंदवून मुंडेंवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

धनंजय मुंडेंनी नैतिक जबाबदारी समजून अत्याचाराचे आरोप झाल्यामुळे मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपने केली आहे. तर, निवडणुकीतील प्रतिज्ञापत्रात दुसरी पत्नी, अपत्ये व त्यांचा खर्च लपवल्याने त्यांची आमदारकी देखील रद्द करावी अशी मागणी होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हे आरोप गंभीर असून पक्ष विचार करून लवकरात लवकर निर्णय घेऊन कारवाई करेल असे सांगितले आहे.

तर, भाजपचे नेते कृष्णा हेगडे यांच्यासह मनसेच्या मनीष धुरी यांनी आपल्याला देखील धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेने हनीट्रॅपमध्ये अडकवून ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न केला पण वेळीच सावध झाल्याने बचावल्याचे सांगत पोलिसांकडे धाव घेतली आहे. यामुळे राजकीय गोटात मोठी खळबळ माजली आहे. तर, थोड्या वेळापूर्वीच आयपीएस विश्वास नांगरे पाटील यांनी पवारांच्या निवासस्थानी सिल्वर ओकवर जाऊन त्यांची भेट घेतलीय. त्यानंतर नांगरे पाटील आता सह्याद्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. यामुळे आता पोलीस काय भूमिका घेणार हे महत्वाचं आहे.

महत्वाच्या बातम्या