fbpx

विश्वजीत कदम आणि राज ठकारे यांच्या भेटीने राजकीय चर्चेंना उधान

टीम महाराष्ट्र देशा: युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि पतंगराव कदम यांचे सुपुत्र विश्वजीत कदम यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चेंना उधान आले आहे. सांगली जिल्ह्यातील औदुंबर इथे सदानंद साहित्य मंडळाच्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. तेव्हा ही भेट झाली आहे.

‘आमचे आधीपासून चांगले संबंध आहेत.राज साहेबांना भारती विद्यापीठाचा एक कॅम्पस पाहायचा होता. त्यासाठी मी त्यांची भेट घेतली,’ ही भेट म्हणजे मैत्रीखातर होती आणि राजकीय चर्चा न होता महाराष्ट्रातल्या सामाजिक विषयांवर आमच्यात चर्चा झाली असं स्पष्टीकरण विश्वजीत कदम यांनी दिलंय. मात्र तब्बल आर्धा तास झालेल्या चर्चेतील तपशील बाहेर येऊ शकला नसला तरी या भेटीने राजकीय पंडितांच्या भुवया मात्र उंचावल्या  आहेत.