विश्वजीत कदम यांनी घेतली विधानसभा सदस्यत्वाची शपथ

मुंबई : पलूस-कडेगाव, जि. सांगली मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत विश्वजीत कदम बिनविरोध निवडून आले आहेत. विधानमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी त्यांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ दिली.

यावेळी व्यासपीठावर विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, महाराष्ट्र विधानमंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे उपस्थित होते. या शपथविधी सोहळ्याला लोकसभा सदस्य अशोक चव्हाण, विधानपरिषदेचे सदस्य शरद रणपिसे, मोहनराव कदम, जयंत पाटील, आनंदराव पाटील, हरिभाऊ राठोड, अमरनाथ राजूरकर, हर्षवर्धन सपकाळ, विधानसभेचे विद्यमान सदस्य तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सदस्य सर्वश्री जयंत पाटील, सुनिल तटकरे, डी.पी.सावंत, डॉ. सतेज पाटील, गोपालदास अग्रवाल, सुनिल केदार, प्रणिती शिंदे विधीमंडळाचे सदस्य, यावेळी होते.