पंतगरावांचा गड राखण्याची जबाबदारी विश्वजित कदमांवर ; कॉंग्रेसने जाहीर केली उमेदवारी

टीम महाराष्ट्र देशा : सांगली जिल्ह्यातील पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. येथे २८ मे रोजी मतदान होणार असून, ३१ मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीमध्ये काँग्रेसने अपेक्षेप्रमाणे पतंगराव कदम यांचे सुपुत्र विश्वजित कदम यांना उमेदवारी दिली आहे.

Loading...

दरम्यान, भाजपने या निवडणुकीत उमेदवार देण्याचा निर्णय स्पष्ट केला नसला तरी राष्ट्रवादी कॉंग्रेसने या पोटनिवडणुकीत उमेदवार न उतरवण्याचा निर्णय घेत विश्वजित कदम यांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे.

सांगली जिल्ह्यातील पलूस-कडेगाव मतदारसंघाचे प्रतिनिधित्व पतंगराव कदम करायचे. ९ मार्च २०१८ रोजी त्यांचे निधन झाले. त्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. या पोटनिवडणुकीची अधिसूचना ३ मे रोजी जारी होणार असून, १० मे पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत असेल.

पतंगराव यांच्या जाण्याने सांगली जिल्ह्यात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ही पोकळी भरून काढण्यासाठी विश्वजित कदम हे प्रथमच विधानसभेच्या रिंगणात उतरणार आहेत. याआधी त्यांनी २०१४ च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत पुण्यातून निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना भाजपाच्या अनिल शिरोळे यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता.Loading…


Loading…

Loading...