धक्कादायक : ‘विश्वजीत कदमांनी माझं अपहरण करून अर्ज मागे घ्यायला लावला’

टीम महाराष्ट्र देशा : पलूस-कडेगाव विधानसभा पोटनुवडणुकीच्या वेळी काँग्रेसचे विश्वजीत कदम यांनी माझे अपहरण करून जबरदस्तीने माझा उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावला होता असा आरोप साताऱ्याचे नेते अभिजीत बिचुकले यांनी केला आहे.

‘सांगली जिल्ह्यातील पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातील २०१८ च्या पोटनिवडणूकीच्या वेळी काँग्रेसचे उमेदवार विश्वजीत कदम यांनी माझे अपहरण केलं. त्यानंतर मला जबरदस्तीने उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावला होता.’ असा खबळजनक आरोप साताऱ्याचे नेते अभिजीत बिचुकले यांनी केला आहे. सांगलीमध्ये बिचुकले हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांच्याकडून माझ्या कुटुंबाला धोका असून, कदम यांच्यावर कारवाई केली नाही तर, सांगलीत आमरण उपोषण करणार असल्याचा इशाराही बिचुकले यांनी दिला आहे.