fbpx

…म्हणून आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले

टीम महाराष्ट्र देशा : राज्याचा बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्तार रविवारी पार पडला. या मंत्रिमंडळ विस्तारात १३ मंत्र्यांना मंत्रिमंडळात समावून घेण्यात आले. तर विद्यमान ६ मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले. महाराष्ट्रचे आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांना देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्रिमंडळातून वगळले आहे. मात्र आपल्यावर मंत्रीपदाची जबाबदारी नको अशी विनंती खुद्द विष्णू सावर यांनीच केली होती, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

विष्णू सावर हे गेले अनेक दिवस आजारी आहेत. त्यामुळे ते पक्षाच्या कोणत्याही मेळाव्याला , कार्यक्रमाला देखील अनुपस्थित असतात. तसेच काही दिवसांनी त्यांच्यावर मोठी शस्त्रक्रिया देखील होणार आहे. त्यामुळे आजारपणात राज्याच्या मंत्रीपदाचा भार नको म्हणून सावरा यांनी मुख्यमंत्र्यांकडे मंत्रिपद हे अन्य नेत्याला द्यावे अशी विनंती केली होती.

दरम्यान तसे पाहता सवरा यांच्याबद्दल तसेच त्यांच्या खात्याच्या कारभाराबद्दल पक्षात प्रचंड नाराजी होती. त्यामुळे ते राहत असलेल्या वाडा या शहराच्या नगर पंचायतीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांनी कन्या निशा पराभूत झाली होती. तर ही नगरपंचायत शिवसेनेने जिंकली होती. ते पालकमंत्री असलेल्या पालघर जिल्ह्यातील मोखाडा, जव्हार, पालघर, या दोन नगरपंचायती व जव्हार पालिका यात सेनेचा झेंडा फडकला होता.