विधानसभेचं घमासान : निलंग्यात होणार ‘तगडी’ फाईट

निलंगा (प्रतिनिधी): लोकसभा निवडणूकीच्या निकालावरच आगामी विधानसभा निवडणूकीची समीकरणे अवलंबून असल्यामुळे लातूरचा खासदार कोण होणार याबाबात राजकीय वर्तुळात कमालीची उत्सुकता आहे. लोकसभेच्या निकालानंतरच आगामी विधासभा निवडणूकीचे नेमके चित्र स्पष्ट होणार आहे.

राज्याचे कौशल्य विकास तथा कामगारमंञी संभाजीराव पाटील निलंगेकर हे सध्या निलंगा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यामुळे सहाजिकचं भाजपकडून आगामी विधानसभा निवडणूकीसाठी तेच उमेदवार राहणार याबाबत काही दुमत असता कामा नये. दरम्यान, संभाजीराव यांचे कनिष्ठ बंधू अरविंदराव यांचे नाव विधानसभेसाठी चर्चेत आहे.

Loading...

मधल्या काळात औसा येथून अरविंद पाटील निलंगेकर यांच्या नावाची जोरदार चर्चा ऐकावयास येत होती. परंतु मागील काही दिवसापासून मुख्यमंञ्यांचे सहाय्यक अभिमन्यू पवार औसा मतदारसंघात कमालीचे सक्रीय झाले असून ते औसा मतदारसंघात कायमच तळ ठोकून आहेत. त्यामुळे निलंगा मतदारसंघातून अरविंदराव यांच्या नावाच्या चर्चेने जोर धरला आहे. त्यातच अलीकडे ते या मतदारसंघात कमालीचे सक्रीय झाल्याचे पाहायला मिळत आहे.

त्यामुळे या चर्चेला आणखीन बळ मिळत आहे. या पार्श्वभूमीवर संभाजीराव किंवा अरविंदराव या भावंडापैकी एक जण आगामी विधानसभेसाठी भाजपचा उमेदवार राहणार हे निश्चित. आघाडीत ही जागा काँग्रेसला सुटली असल्यामुळे काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर हे काँग्रेसकडून उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार आहेत. अशोकराव हे माजी मुख्यमंञी डाँ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे सुपूञ असून पक्षश्रेष्ठी दरबारी असलेले डाँ.निलंगेकर यांचे राजकीय वजन पाहता अशोकराव यांनाच उमेदवारी मिळणार असा दावा अशोकराव यांच्या समर्थकांकडून केला जात आहे.

नुकतेच शिवसेनेला जयमहाराष्ट्र ठोकून काँग्रेसमध्ये दाखल झालेले शिवसेनेचे सह-संपर्क प्रमुख अभय साळुंके हे उमेदवारीबाबत दावा ठोकण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील दोन विधानसभा निवडणूका त्यांनी लढविल्या असून ते अत्यंत महत्वकांक्षी आहेत. त्यामुळे केवळ आमदारकीचे स्वप्न डोळ्यासमोर ठेवून आगामी विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर साळुंके काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत, यामागचा काय नेमका अर्थ घ्यायचा?

साळुंके यांच्याबरोबरच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंडीतराव धुमाळ,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील यांची नावे देखील काँग्रेसमध्ये चर्चेत आहेत. तर काँग्रेस आघाडीच्या ५० टक्के जागा वाटपाच्या सूञानुसार निलंगा मतदारसंघ आगामी विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसला सुटणार असून आगामी विधानसभा निवडणूकीत आघाडीचा उमेदवार आपण राहू असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विनायक बगदूरे यांच्याकडून केला जात आहे.

पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे आपण याबाबत मागणी केली असून त्यांच्याकडून आपल्याला तसे स्पष्ट संकेत मिळाल्याचे बगदुरे सांगतात. आगामी निवडणूकीत काँग्रेसआघाडी सोबत मनसे जाणार असल्याने मनसे जिल्हाध्यक्ष डाँ.नरसिंह भिकाणे यांच्या आमदारकीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

त्यामुळे आगामी विधानसभेच्या फडात डाँ.भिकाणे यांनी शड्डू ठोकल्यास काही आश्चर्य वाटू नये. माजी आमदार माणिकराव जाधव व शिवसेनेचे नेते लिंबन महाराज रेशमे सध्या तरी ‘वेट अँन्ड वाँच’च्या भूमिकेत असून त्यांनी आपला पत्ता अद्यापतरी उघड केला नाही.लोकसभा निवडणूकीची समीकरणे बदलून टाकणा-या वंचीत बहूजन आघाडीकडून विधानसभेसाठी कोण इच्छुक आहे हे अजून गुलदस्त्यात आहे.

एकुणच आगामी विधानसभा निवडणूकीकरीता अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असल्याने ही निवडणूक कमालीची चुरशीची होणार आहे. यावेळची ही राजकीय दंगल एकमेकांचे पारंपरिक विरोधक असलेले ‘अशोकराव व संभाजीराव’ या काका-पुतण्यांमध्ये होणार की नव्या पैलवानांमध्ये होणार याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागून राहिले आहे, हे माञ निश्चित!

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आणि... अजित दादांमुळे मुख्यमंत्र्यांवर ओढविणारी नामुष्की टळली
'भाजप-सेनेनं एकत्र यावं, मिळून सरकार स्थापन करु' ; NDAच्या बड्या नेत्याचं आवाहन
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने राजीनामा द्यावा ,सुप्रिया सुळेंची मागणी
'बोकड बांधा लागते, मसाले आणा लागते, गावात तेव्हा लोक 'मतदान' करतात' : बच्चू कडू
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
फडणवीस साहेब कदाचित आपला गजनी झालायं - रुपाली चाकणकर
बालेकिल्ल्यात भाजपला धक्का; मेहतांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी-सेनेची माफी मागत भाजप सोडली
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
इंदुरीकर-देसाई वादात आता 'भोर' महाराजांची ऊडी ; देसाईंना कापून टाकण्याची धमकी