‘इन्फोसिस’च्या सीईओचा राजीनामा

vishal sikka infosis resigns

वेबटीम : इन्फोसिसचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विशाल सिक्का यांनी प्रमोटर्सबरोबर सातत्याने होत असलेल्या मतभेदांमुळे अखेर पदाचा राजीनामा दिला आहे. सिक्का यांचा राजीनामा लगेचच स्वीकारत त्यांना पदोन्नती देत कार्यकारी उपाध्यक्ष म्हणून नियुक्त केल्याचे कंपनीने निवेदनात म्हटले आहे. त्यांच्या जागेवर यू.बी.प्रवीण राव यांची कंपनीच्या हंगामी एमडी आणि सीईओपदी नियुक्ती करण्यात आली आहे.


कंपनीच्या कामकाजात बदल, वेतन वाढ, नोकरी सोडून जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची वाढती संख्या, कंपनी सोडणाऱ्यांना देण्यात येणारा मोबदला (सेवरन्स पे) आदी विविध बाबींवरून प्रमोटर सातत्याने आवाज उठवत होते. विशषत: कंपनीचे सहसंस्थापक नारायणमूर्ती या मुद्यांवर नाराज होते. कंपनीचे माजी सीएफओ राजीव बन्सल यांना देण्यात आलेल्या सेवरन्स पेवर आक्षेप नोंदवण्यात आला होता.
दरम्यान, आपल्या चांगल्या कामाकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप सिक्का यांनी आपल्या राजीनामा पत्रात केला आहे. माझ्या कामात सातत्याने अडथळे निर्माण करण्याचे काम केले जात, असे त्यांनी म्हटले आहे.