‘विशाल पाटील २५ हजार मतांनी निवडून येतील’

टीम महाराष्ट्र देशा : सांगली लोकसभा मतदारसंघातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार विशाल पाटील हे कमीत कमी २५ हजार मतांनी विजयी होतील असा विश्वास आमदार विश्वजित कदम यांनी व्यक्त केला आहे.

विश्वजित कदम यांनी एक्झिट पोलवर भाष्य करताना ‘माध्यमांनी व्यक्त केलेले अंदाज मला काही योग्य वाटत नाहीत. विशाल पाटील किमान २५ हजार मतांनी जिंकतील असा माझा विश्वास आहे तसेच भाजप सरकार विरोधात लोकांमध्ये राग आहे. काँग्रेसने हा रोष आपल्या प्रचारातून मांडला आहे. राज्यात काँग्रेसला चांगलं यश मिळेल कारण माध्यमांनी व्यक्त केलेले अंदाज विसंगत आहेत. त्यामुळे २३ मे रोजी सर्व चित्र स्पष्ट होईल, असं ते म्हणाले.

दरम्यान, सांगली लोकसभा मतदारसंघात भाजपकडून विद्यमान खासदार संजय पाटील, स्वाभिमानीकडून विशाल पाटील तर वंचित बहुजन आघाडीकडून गोपीचंद पडळकर अशी तिरंगी लढत होत आह्रे.