क्वारंटाईनमध्येही क्युट कपल अनुष्का-विराटचा रोमांस सुरूच, शेअर केला व्हिडिओ

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या परिणामामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे क्रीडा स्पर्धा देखील रद्द करण्यात आल्या आहेत. प्रत्येकाला आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवायला येत आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलीवुड अभिनेत्री अनुष्का शर्मा लॉकडाऊनमुळे घरीच आहेत.त्यांनी एकमेकांबरोबर क्वालिटी टाइम देत असताना व्हिडीओ पोस्ट केला आहे.

क्रिकेट विश्वातील हे क्युट कपल क्वारंटाईन मध्ये काय करत आहेत, हे जाणुन घेण्याची उत्सुकता नक्की लागली असेल. हा पोस्ट केलेला व्हिडीओ पाहून ती नक्की संपेल. या व्हिडिओमध्ये अनुष्का विराटची हेअर स्टायलिस्ट बनली आहे. अनुष्का विराटचे केस कापत आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी विराट आणि अनुष्का शर्मा यांनी मिळून एक व्हिडिओ पोस्ट केला होता. “आपण सर्व आव्हानात्मक परिस्थितीतुन जात आहोत, कोरोना व्हायरसचा प्रसार रोखला जाऊ शकतो त्यासाठी सर्वांनी घरी थांबण्याची गरज आहे. आम्ही दोघेही स्वतःच्या आणि इतरांच्याही सुरक्षिततेसाठी घरीच थांबत आहोत. एकांतवासात जाऊन सुरक्षितत राहु,” असा संदेश या दोघांनी दिला आहे.

या आधीही विराट-अनुष्काने कोरोनाबाबत जनजागृती करणारा व्हिडीओ पोस्ट केला होता. पण विराटने अद्याप कोरोनाग्रस्तसाठी मदत जाहीर केलेली नाही. त्यामुळे यांच्यावर टीका करण्यात येत आहे.