स्वखर्चाने खड्डे बुजवणाऱ्या व्यक्तिला विरुचा सलाम

Virender

वेबटीम: वीरेंद्र सेहवाग कायमच ट्विटर वर वेगवेगळ्या विषयावर भाष्य करत असतो कधी तिखटपने बोलतो तर कधी खुपच मिश्किल प्रतिक्रिया देत असतो. हैदराबाद मधील एक व्यक्ति जी स्वताच्या पैशातुन रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवन्याचे काम करत आहे. गंगाधर कथनाम अस या व्यक्तिच नाव आहे. विरुने आपल्या खास शैलीमधून या अवलियाला ट्विटर वर सलाम केला आहे व त्यांचा फोटो देखील शेयर केला आहे.

हैदराबादच्या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे गंगाधर कथनाम त्रस्त झाले होते. सात वर्षांपूर्वी त्यांनी खड्डे बुजवण्याची मोहीमच हाती घेतली. सुरुवातीला त्यांनी स्वतःच्या खिशातून पाच हजार रुपये खर्च करुन एक खड्डा बुजवला होता. पण ते यावरच थांबले नाहीत तर त्यांनी ख़ड्डे बुजवण्याचा ध्यासच घेतला. रेल्वेतून सेवानिवृत्त झाल्यानंतर गंगाधर कथनाम हे त्यांना मिळत असलेल्या पेन्शनमधून रस्ते दुरुस्तीचे काम करतात. आतापर्यंत त्यांनी सुमारे बाराशे खड्डे बुजवले आहेत. यांच्या कामाने सेहवाग प्रभावित झाला असून त्याने ट्विटरवर गंगाधर कथनाम यांचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये गंगाधर कथनाम खड्डे बुजवण्याचे काम करताना दिसत आहेत. सेहवागने ट्विट केल्यानंतर अनेकांनी गंगाधर कथनाम यांच्या कामाचे तोड़ भरून कौतुक केले आहे.