fbpx

सेहवाग रोहतक लोकसभा मतदारसंघातून नवी इनिंग सुरू करणार असल्याची चर्चा

नवी दिल्ली: लोकसभेच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राजकीय पक्ष अनेक स्टार मंडळीना आपल्या गोटात सामील करून घेण्याचा प्रयत्न करत आहे. अश्याच स्टार मंडळींपैकी नेहमी चर्चेत असणारे नाव म्हणजे टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवाग .

सेहवाग लवकरच राजकारणाच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत सेहवाग भाजपाकडून निवडणूक लढवू शकतो. रोहतक मतदारसंघातून सेहवागला निवडणुकीच्य आखाड्यात उतरविण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. भाजपाच्या कोअर कमिटीची नुकतीच बैठक झाली. त्यावेळी सेहवागच्या नावाची चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे .

सेहवागच्या राजकारणातील प्रवेशामुळे हरियाणामध्ये भाजपला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. सेहवागच्या प्रचंड लोकप्रियतेमुळे रोहतकमध्ये काँग्रेसचे दिग्गज नेते दीपेंद्र सिंह हुड्डा यांचा पराभव करणे सहज शक्य होईल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.आता याबद्दल सेहवाग नेमका काय निर्णय घेणार, हे पाहणं महत्त्वपूर्ण ठरेल.

 

3 Comments

Click here to post a comment