आज पासून सुरु होणार ‘विराटसेने’चा सराव सामना ; खेळाडूंच्या कामगिरीकडे असणार लक्ष

tim india

इंग्लंड : आज मंगळवारपासून कौंटी संघाविरुद्ध सुरू होत असलेल्या तीन दिवसाच्या सराव सामन्यात  भारतीय संघातील खेळाडूंवर सर्वांचे लक्ष असणार आहे. डब्ल्युटीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर भारत आणि इंग्लंड संघादरम्यान पाच कसोटी सामन्याची मालिका खेळवण्यात येणार आहे. ही मालिका येत्या ४ ऑगस्टपासुन सुरु होणार आहे.

या मालिकेपूर्वी भारतीय संघ काही काळासाठी सुटीवर गेला होता. याकाळात इंग्लंडमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढतच होता. याचा परिणाम म्हणून भारतीय संघाचा यष्टीरक्षक रिषभ पंतला कोरोनाची लागण झाली. त्यामुळे आज सुरु होणाऱ्या कौंटी संघाविरुद्धच्या सामन्यात   ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत लोकेश राहुल हा यष्टिरक्षणाची धुरा सांभाळणार आहे.

इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी संघाला सरावाची संधी मिळावी, यासाठी असा सामना आयोजित करण्यात आला आहे. तसेच शुभमन गिल जखमी होऊन बाहेर पडल्यानंतर मयंक अग्रवाल याच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा असणार आहेत. रोहित शर्मासोबत सलामीला मयंक येईल, अशी शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP